कॅट शो मध्ये 350 मांजर प्रजातींचा सहभाग
- by Aajchi Navi Mumbai
- May 25, 2022
- 874
नवी मुंई ः आशियातील सर्वात मोठा कॅट शो रविवारी नवी मुंबईतील वाशी येथे संपन्न झाला. फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीने या शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 350 मांजर प्रजातींचा सहभाग होता. या शोमुळे मांजरींच्या विविध प्रजाती नागरिकांना पाहायला मिळाल्या.
मांजरांच्या विविध जातींची माहिती व्हावी, मांजरीच्या काळजीबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी एफसीआयच्या पुढाकाराने वाशीतील सिडको प्रदर्शन केद्रांत 22 मे रोजी कॅटवॉकचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 350 माजरांच्या विविध प्रजाती सहभागी झाल्या होत्या. यावेळी मांजरीसोबत रॅम्पवॉकचेदेखील आयोजन केले होते. विविध जातींच्या मांजरी पाहण्यांसाठी 500 हून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. मांजरीची स्वच्छता, नीटनेटकेपणा, आहार आदींवर तज्ज्ञांनी निरीक्षण करुन आयोजकांच्यावतीने मांजरींच्या मालकांना भेटवस्तू देण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai