महिला काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरीपदी कविता कटकधोंड
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 01, 2022
- 1084
नवी मुंबई ः वाशी येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्या कविता कटकधोंड यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई काँग्रेस व महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरीपदी निवड केल्याने कविता कटकधोंड यांनी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेटा डीसुजा, महिला काँग्रेसच्या प्रभारी ममता भुपेश, महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे आणि मुंबई प्रदेश सेक्रेटरी रोशना शहा यांचे आभार व्यक्त केले आहेत.
पक्षाचे माझ्यावर टाकलेल्या विश्वासाप्रती तसेच काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी माध्यमातून मी महिलांच्या समस्या निवारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया कविता कटकधोंड यांनी व्यक्त केली. त्या यापुर्वी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सचिव म्हणून कार्यरत होत्या. गेले 8 वर्ष त्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी वर काम करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai