Breaking News
नवी मुंबई : कन्सलस्टींगचा व्यवसाय करणार्या व्यक्तीकडे फाईल्सचे एज्युडीकेशन करण्यासाठी तब्बल 5 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्विकारणार्या रायगड सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हा अधिकारी शैलेंद्र अर्जुन साटम यांना ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या नवी मुंबई युनिटने सोमवारी रात्री अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावुन अटक केली. यावेळी साटम यांच्या टेबलमध्ये तब्बल 5 लाख 63 हजार 500 रुपये आढळुन आले असून एसीबीच्या पथकाने सदरची रक्कम देखील जप्त केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार सतिश अजमेरा (51) यांचा कन्सलस्टींगचा व्यवसाय असून ते श्रीनाथ इंटरप्रायजेसमार्फत एज्युडीकेशन तसेच स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे, ट्रान्स्फरची कामे करतात. अजमेरा यांच्याकडे एज्युडीकेशनच्या कामासाठी आलेल्या तीन फाईल्स त्यांनी अलिबाग येथील कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिस येथे जमा केल्या होत्या. मात्र अलिबाग येथील कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिस कार्यालयातील सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी देवेंद्र साटम यांनी कॉन्ट्रक्ट फाईलची मागणी नोटीस देण्यासाठी 5 लाख रुपये तसेच एज्युडीकेशनच्या तीन फाईलचे फायनल ऑर्डर देण्यासाठी 30 हजार रुपये असे एकुण चार फाईलचे 5 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे अजमेरा यांनी नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नवी मुंबई एसीबीच्या पथकाने गत महिन्यात याबाबत खातरजमा केली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी सह जिल्हा निबंधक देवेंद्र साटम यांनी अजमेरा यांच्याकडून तीन फाईलचे फायनल ऑर्डर देण्यासाठी 30 हजार रुपये स्विकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या टेबलची झडती घेतली असता, अजमेरा यांच्याकडून घेतलेल्या रक्कमे व्यतिरिक्त 5 लाख 63 हजार 500 रुपयांची रक्कम आढळुन आली. एसीबीच्या पथकाने सदरची रक्कम जफ्त करुन साटम याच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. सदर कारवाई नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोच्या उपअधिक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai