विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रेंनी केली विकास कामांची पाहणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 21, 2022
- 639
पनवेल : रस्त्यावरील खड्डे, गटारे बंदिस्त यासारखी नागरीकांना अडथळा ठरणारी कामे त्वरीत पुर्ण कररण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली होती. म्हात्रे व त्यांच्या सहकार्यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु झालेल्या विकास कामांची पाहणी प्रितम म्हात्रे यांनी केली. यावेळी ठेकेदारासह पालिका अधिकार्यांना कामे लवकरत पुर्ण करण्याच्या सूचना केल्या.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ड-प्र.क्र.18 मधील अ.भु.क्र.127 अ ते 124/2 ते अ. भु. क्र 139 ते म्हात्रे हॉस्पिटल ते अ.भु.क्र 142 व श्री कोटी भास्कर (वृंदावन हॉटेल) ते काळे ह्यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु आहे. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि सहकार्यांच्या पाठपुराव्याने ही कामे मंजूर झाली होती. येथील म्हात्रे हॉस्पिटल परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली. शाळा आणि पावसाळा सुरू झालेला आहे. ठेकेदार कामात दिरंगाई करत होता. त्यास जाब विचारून तातडीने नव्याने बांधण्यात आलेल्या आर सी सी गटार बंदिस्त करण्याच्या सूचना प्रीतम म्हात्रे यांनी केल्या आहेत. खुली गटारे तातडीने बंदिस्त करण्यास सांगितले आहे. या संदर्भातील तक्रारी म्हात्रे यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या. पालिका अधिकारी संजय कटेकर यांना काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्यासह पालिका अधिकारी संजय कटेकर, सूत्रसंचालक हरीश मोकल, प्रणिल बारटक्के, चंद्रकांत म्हात्रे, दीपक कुदळे, अविनाश मकास, दर्शन कर्डीले, रोहन गावंड तसेच येथील रहिवासी यावेळी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai