‘गाव तेथे मानसोपचार’ अभियानाचा चौथा टप्पा सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2022
- 995
नवी मुंबई ः भारतात आजही मानसिक स्वास्थ आणि त्यानिगडीत आजारांविषयी, त्यांच्या उपचारांविषयी गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी मानसोपचार-राज्यव्यापी मनस्वास्थ जनजागृृती अभियान ह्या अनोख्या समाजप्रबोधनपर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये ‘गाव तेथे मानसोपचार’ या अंतर्गत अनेक मानसोपचारतज्ज्ञ स्वतः पुढाकर घेऊन सामुदायिक पातळीवर विविध कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन केले जाते. याचा चौथा टप्पा राज्यभरात यावर्षी 26 जूनला सुरु होणार असून ते 31 जुलैला याची सांगता होणार आहे.
शारिरक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हे सर्वांगिण आरोग्यसाठी महत्वाचे आहे. लोकांचे मानसिक आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन ‘गाव तेथे मानसोपचार’ उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत अनेक मानसोपचारतज्ज्ञ स्वतः पुढाकर घेऊन सामुदायिक पातळीवर विविध कार्यक्रम घेत असतात. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालये, विविध संस्था या ठिकाणी चर्चासत्र आयोजित करणे, जागरुकता अभियान राबवणे, गाव पातळीवर आणि वस्ती पातळीवर कॅम्प घेणे, समाजातील तरुणांना व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन करणे अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा समाजामध्ये ज्या पद्धतीने इतर आजारांना स्विकारलेले दिसते त्याचपद्धताने मानसिक आजारांना देखील स्विकारायचे आणि त्यावर कुठल्याही प्रकारचा किंतु न ठेवता उपचार घ्यावा हा आहे. याविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याने राज्यभरातील समविचारी मानसोपचार तज्ञांनी एकत्र येऊन ‘गाव तेथे मानसोपचार-राज्यव्यापी मनस्वास्थ जनजागृृती’ अभियान ह्या अनोख्या समाजप्रबोधनपर उपक्रमाची सुरुवात केली आहे.
या अभियानाचे पहिले तीन टप्पे याआधी यशस्वीरित्या पार पडले. सध्याच्या काळात आणि विशेषतः कोरोनानंतर तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले असून त्याला आळ घालणे महत्वाचे आहे. त्याकरिता चौथा टप्पा राज्यभरात यावर्षी 26 जूनला सुरु होणार असून ते 31 जुलैला याची सांगता होणार आहे. यावेळीचे थीम ‘नशा मुक्त भारत स्वस्थ भारत’ असून सर्व उपक्रम हा या संदर्भातील जागरुकता व्हावी याकरिता असणार आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात तसेच इतर राज्य मिळून जवळपास 400 मानसोपचार तज्ज्ञांनी या मोहिमेत सक्रिय काम करुन पांठिबा दर्शविला आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेविषयी गैरसमज दूर करणे, व्यसन हाही एक मानसिक आजार आहे. त्याकरिता प्रतिबंधक उपाय आणि शास्त्रीय उपचार उपलब्ध आहे. याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य हेतु आहे. ज्यामुळे सशक्त व्यसनमुक्त तरुणाई तयार होण्यास मदत होऊन देशाच्या विकासाला हातभार लागेल. हे अभियान सफल करण्यासाठी राज्यातील मानसोपचारतज्ज्ञ अथक प्रयत्न करीत आहेत. या राज्यव्यापी अभियानाचा एक अविभाज्य भाग असलेले वाशी येथील परिचित मानसोपचार तज्ञ डॉ. विकास देशमुख हे तरुणांना महाविद्यालये, शाळा येथे प्रत्यक्ष जाऊन होणार्या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai