देहरंग धरणच्या पाणीपातळीत वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2022
- 669
दिवसाला 12 दशलक्षलिटर पाणीपुरवठा
पनवेल : जोरदार पावसामुळे पनवेलला पाणीपुरवठा करणार्या देहरंग धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने धरणातून दिवसाला 10 ते 12 दशलक्षलिटर पाणीपुरवठा करणे सुरू केले. गेली दीड महिना दिवसाआड पाणीपुरवठ्यातून पनवेलकरांची सुटका झाली आहे.
पनवेल शहराला देहरंग धरणातून पाणीपुरवठा होतो. मात्र मागील 20 वर्षांपासून धरणातील गाळ न काढल्याने तसेच मागणी वाढल्याने हा पाणीसाठा पनवेलकरांना अपुरा पडत आहे. त्यामुळे मार्च, एप्रिलपासूनच शहरात पाणी कपात केली जाते. पनवेलचा हा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने अमृत योजनेअंतर्गत पाताळगंगातून पाणी उपसा करून जलवाहिनीद्वारे पनवेलला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. यावर्षी गेल्या दीड महिन्यापासून पनवेलमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा होत होता, तर गेली चार महिने आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा लागत होता. त्यात पावसाने ओढ दिल्याने हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र गुरुवारपासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे देहरंग धरणाची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पनवेल पालिकेने धरणातून दिवसाला 10 ते 12 दशलक्षलिटर पाणीपुरवठा करणे सुरू केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai