नवी मुंबई शिवसेनेतही फुट
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 08, 2022
- 847
निम्म्याहून जास्त माजी नगरसेवक शिंदे गटात
नवी मुंबई ः बंडखोरी करताना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाण्यानंतर नवी मुंबईतील जवळपास 30 ते 32 माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचे चित्र आहे. गुरुवारी या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आम्ही आपल्या सोबत असल्याचे सांगितले. यामुळे नवी मुंबई शिवसेनेतही फुट पडल्याचे दिसते.
राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेतील बंडखोरीने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुखांमध्येही फुट पडत आहे. ठाण्यातील नगरसेवकांचा मोठा गट शिंदे गटात सामील झाला आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबईतीलह 30 हून अधिक माजी नगरसेवकही याच वाटेवर आहेत. यातील काहींनी गुरुवारी शिंदे यांची भेट घेऊन आम्ही आपल्या सोबत असल्याचे सांगितले. तसचे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे या पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. यामध्ये ऐरोली मतदार संघातील बहुंताश माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी विरोधीपक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी नगरसेवक किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील हे शिंदे गटात सामिल होणार आहेत. मात्र ऐरोली व बेलापुरचे दोन्ही जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक एम.के.मढवी, सोमनाथ वास्कर, शहरप्रमुख ते पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख राज्यातील सर्व पदाधिकार्यांच्या बैठका घेत आहेत. बुधवारी त्यांनी नवी मुंबईतील माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकार्यांची एक बैठक घेतली. यावेळी दक्षिण व उत्तर नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनुक्रमे विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली बेलापुर मतदारासंघातील आठ माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. दक्षिण व उत्तर नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनुक्रमे विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली बेलापुर मतदारासंघातील आठ माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासबोत राहणार असून त्यांनी बुधवारी ठाकरे यांची भेट घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai