एकल प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्धार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 16, 2022
- 696
नवी मुंबई ः हजारो वर्षे नष्ट न होणारे प्लास्टिक हे मानवी जीवनाला व पर्यावरणाला हानीकारक असून केंद्र व राज्य शासनाने एकल वापर म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकला प्रतिबंध केला आहे. या अनुषंगाने कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने विशेष कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्धार करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहामध्ये गुरुवारी एकल प्लास्टिक वापर प्रतिबंध जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच नागरिकांच्या संपूर्ण सहयोगामुळे एकल प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे प्रतिबंध घालणारे नवी मुंबई हे प्रथम क्रमांकाचे शहर ठरेल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016, नियम 4 (2) अन्वये 1 जुलै 2022 पासून कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे याची सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांशी प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात संवाद साधून शंकानिरसण करण्यात आले. यावेळी नागरिकांकडून प्लास्टिकच्या काही वस्तूंच्या वापराबाबत उपस्थित प्रश्नांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात लेखी निवेदने सादर करण्याची सूचना करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी बी पाटील यांनी 1 जुलैच्या सुधारित नियमावलीनुसार पॉलिस्टिरीन आणि विस्तारित पॉलिस्टिरीनसह सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असल्याची माहिती देत या कार्यशाळेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबतची वस्तुस्थिती नागरिकांपर्यंत पोहचविली जाणार असून कार्यशाळेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी याबाबतचा प्रचार करावा असे आवाहन केले. पावसाळी कालावधीतही या कार्यशाळेस पर्यावरणप्रेमी नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट, हॉटेल तसेच सामाजिक व निमशासकीय संस्था यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंदी असणारे प्लॅस्टिक
- प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांडया, प्लास्टिकचे झेंडे, कँडी, कांडया, आईस्क्रीम काडया.
- सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल)
- प्लेट्स, कप, ग्लासेस, काटे, चमचे, चाकू यासारखी कटलरी, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकीटांभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, प्लास्टिकचे पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)
- एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध
- सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या
- ब) सर्व प्रकारच्या नॉन - ओव्हन बॅग्स (पॉलिप्रोपिलीन पासून बनविलेले)
- क) एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन - डिश, बाऊल, कंटेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजींगकरिता)
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai