Breaking News
मुंबई ः ओडीशाच्या आदिवासी कन्या द्रौपदी मुर्मू यांचा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय होऊन त्यांची भारताच्या 15 व्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्या भारताच्या दुसर्या महिला राष्ट्रपती तर पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यांना एकूण मतांच्या 64 टक्के तर यशवंत सिन्हा यांना 36 टक्के मते मिळाली. 25 जुलैला मुर्मू त्यांचा शपथविधी होणार आहे.
अनेक संकटांचा सामना करत द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्याने त्या पूर्णपणे कोलमडल्या होत्या. पण त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने उभं राहून आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निवडला. 20 जून 1958 रोजी जन्मलेल्या मुर्मू यांनी 1997 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1997 मध्ये पहिल्यांदा त्या नगरसेविका बनल्या. आज त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. 18 जूलैला राष्ट्रपतीपदासाठी 99.8 टक्के मतदान झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai