96 दिवसांत 96 सदनिकांचे बांधकाम पुर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2022
- 673
- बांधकाम क्षेत्रात सिडकोचा नवा विक्रम
नवी मुंबई ः जगप्रसिद्ध प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सिडकोने 96 सदनिका असणार्या 12 मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ 96 दिवसांत पूर्ण केले आहे. याद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात इतिहास रचला आहे.
सिडकोतर्फे ‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांसाठी सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सिडकोने ‘मिशन 96’ अंतर्गत कमीत कमी वेळात बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले होते. त्यानुसार कंत्राटदार मे. लार्सन अॅन्ड टुब्रो यांनी बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासह सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्याकरिता प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून, 96 सदनिका असणार्या 12 मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ 96 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. 4 एप्रिल 2022 रोजी सुरू झालेले 12 मजली इमारतीचे बांधकाम 9 जुलै 2022 रोजी पूर्ण करण्यात आले असून यामुळे रेरा कायद्यातील वेळेत बांधकाम पूर्ण करण्याच्या मानकाचेदेखील अनुपालन करण्यात आले आहे.
प्रीकास्ट तंत्रज्ञान हे भविष्यात सर्वोत्तम गुणवत्तेसह नियंत्रित वातावरणात यांत्रिक पद्धतीने निवासी इमारतींचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. सदर बांधकामामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण (फिनिशिंग) करण्यासह अधिसंरचनेच्या (सुपरस्ट्रक्चर) 1,985 प्रीकास्ट घटकांचे उत्पादन (प्रॉडक्शन) आणि प्रतिष्ठापन (इन्स्टॉलेशन) करणे आणि 64,000 चौ. फुट बांधीव क्षेत्रावर यांत्रिक, विद्युत, नळकाम विषयक कामे (एमईपी) करण्याचा समावेश होता. बांधकाम तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बांधकामाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai