राजकारणात बुद्धीचा नाही बळाचा वापर सुरु..
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2022
- 731
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा
मुंबई ः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यांना ईडीने रविवारी अटक केली. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आजच्या राजकारणात बळाचा वापर सुरु आहे. बळ तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस हे सारखे नसतात. दिवस फिरतात. तुमचं काय होईल याचा विचार सुद्धा भाजप आणि नड्डा यांनी करण्याची आवश्यकता आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांच्याबद्दल मला निश्चित अभिमान आहे. संजय माझे जुने मित्र आहेत. मी आताच त्यांच्या कुटुंबियांना भेटून आलो. त्यांचा काय गुन्हा आहे, जे पटत नाही त्याविरोधात बोलतात. मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्यांचं वाक्य अतिशय चांगलं आहे. तेही शरण जाऊ शकले असते. जे तिकडे गेले आहेत त्यांच्याभोवती सत्तेचा फेस आहे. तोपर्यंत ते आमच्यावर टीका करु शकतात. तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची जाणीव होईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे. तसेच जे तिकडे शरण गेले आहे, हमाममध्ये गेले आहे. माझ्या सोबत आहेत ते इमानदार.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं वक्तव्य निर्घृण आणि घृणास्पद आहे. आपण राजकारणाची तुलना बुद्धिबळाशी करतो. पण सध्याचं राजकारण केवळ बळाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आमची अस्मिता चिरडण्याचा भाजपचं काम सुरु आहे. जे पी नड्डा यांचे वक्तव्य हुकूमशाहीकडे नेणारं आहे. अडीच वर्षात डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा गेली नाही. काळ नेहमी बदलत असतो. तुमच्याकडे आज बळ आहे, पण दिवस फिरतात, असं उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटलं.
मी जे परवा सांगितले त्याला पुष्टी देणारे भाषण भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे. सर्वच लोकांनी आता डोळे आणि कान उघडे ठेवून आपला देश जिथे हे नेऊ इच्छितात ते होऊ द्यायचे की नाही हे सामान्य नागरिकाने ठरवण्याची वेळ आली आहे. लोक 20-30 वर्षे भाजपमध्ये येतात. भाजपसोबत लढणारा पक्ष नाही. जे पक्ष संपले नाहीत ते संपतील आणि आपण टिकणार हे जे त्यांचे वक्तव्य आहे हे हुकूमशाहीकडे नेणारे आहे. भाजपचा वंश कुठून सुरु झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच कोश्यारी यांचे वक्तव्यही अपमानास्पद आहे. मी राज्यपाल मुद्दाम म्हणणार नाही. त्यांच्या पोटातील ओठात आल्याने त्यांची पुढील रणनीती काय आहे हे समोर आले आहे. हिंदुत्वामध्ये फूट पाडायची. भाषिक लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा. ज्यामुळे मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण करायचा आहे. मराठी माणसांना चिरडून टाकण्याचे काम आहे. भाजपचे हे काम अत्यंत भेसरूपणे सुरू आहे असंही ठाकरे म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai