खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे कोर्सेस
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 16, 2022
- 648
पनवेल : पनवेलमध्ये प्रथमच एका छत्राखाली केंद्र सरकारचे विविध कोर्सेसची माहिती देण्यासाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये संबंधित विभागातील अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले. या शिबिरात युवक, महिला आणि तृतीय पंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.
सध्याच्या काळात नागरिकांमध्ये स्कीन आणि हेअर ट्रीटमेंट संदर्भात जागृतता झाली आहे. सध्या या क्षेत्रात बरीच रोजगाराची संधी आहे. त्यासाठी त्याला अनुसरून जे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत ते सवलतीच्या दरात जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि तंत्राज हेल्थ अँड ब्युटी वेलनेस क्लिनिकच्या डॉ.पल्लवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहेत. जेणेकरून हे कोर्सेस केल्यावर आपल्या परिसरातच रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी तरुणांना उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. स्कीन आणि हेअर ट्रीटमेंट संदर्भातील इतर कोर्सेस हे 60 ते 80 % सवलतीच्या दरात जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सहकार्यामुळे करता येणार आहेत. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने या विविध कोर्सेस संदर्भात माहिती घेऊन आपल्या आवडीनुसार कोर्सेस करावे. ज्यामध्ये शासनाचे जे अधिकृत शुल्क आहे त्यामध्येच नागरिकांना कोर्सेस उपलब्ध होणार आहेत असे (लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशनच्या) मंजुषा परब यांनी सांगितले. या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले विविध प्रकारचे कोर्सेस संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी पनवेल, खांदा कॉलनी, उरण, वेश्वी आणि खालापूर या ठिकाणी आपल्या संस्थेच्या पुढाकाराने सुरू केले आहेत.
भविष्यात रायगड, नवी मुंबई मध्ये जे नवीन उद्योगधंदे येणार आहेत त्यामध्ये निर्माण होणार्या नोकरीच्या ज्या संधी आहेत त्यावेळी सदर शासनमान्य केलेले कोर्सेसचे प्रमाणपत्र तरुणांना उपयोगात येणार आहे. तसेच नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सुद्धा सदर घेतलेले प्रशिक्षण त्यांच्या भविष्यातील उद्योग वाढीसाठी युवकांना नक्कीच फायदेशीर ठरेल. - प्रितम ज. म्हात्रे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai