Breaking News
मोबाईलमधल्या ऍपच्या मदतीने, चेहर्याच्या ओळखीच्या आधारावर सर्व चेकपॉईंटवर प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. एअरपोर्ट एंट्री, सेक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी या ऍपवरूनच प्रवेश दिला जाणार आहे. दिल्ली विमानतळावर, टी तीन टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दिल्ली विमानतळ आणि बंगळुरु विमानतळाच्या देशांतर्गत प्रवाशांच्या चेहर्याच्या ओळखीसाठी हे ऍप सुरू करण्यात आलं आहे. या ऍपमुळे विमानतळावर होणार्या सर्व त्रासांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. सध्या या ऍपचं बीटा व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे आणि लवकरच ते फुल स्केलवर ऑफर केलं जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएएल) ने एका निवेदनात म्हटलं आहे की, या ऍपच्या सहाय्याने चेहर्याच्या आधारावर सर्व चेकपॉईंटवर प्रवाशांची प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. एअरपोर्ट एन्ट्री, सेक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी या ऍपद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत.
एअर एशिया इंडिया, एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट आणि विस्तारा या टर्मिनलवर हे ऍप चालणार आहे. बंगळुरु इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएएल) कडून त्यांच्या एका वेगळ्या निवेदनामध्ये ‘डिजियात्रा’ ‘बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीमच्या बीटा’ आवृत्तीची विस्तारा आणि एअर एशिया फ्लाइट्सवर चाचणी घेण्यात आली. ‘डिजिटल यात्रा’ची बीटा आवृत्ती ‘अँड्राईड ओएस’साठी ‘प्लेस्टोअर’ वर उपलब्ध आहे. ऍपलच्या ‘आयओएस प्लॅटफॉर्मवर’ही हे ऍप पुढील काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार आहे.
दिल्ली विमानतळावरील अधिकार्यांकडून सांगण्यात आलं आहे की हे एक बायोमेट्रिक चेहरा ओळखणार्या तंत्रज्ञानावर आधारित ऍप आहे. प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि कागदपत्रांशिवाय विमानतळावर प्रवेश मिळवून देणं हा या ऍपमागचा उद्देश आहे.
बंगळुरु विमानतळाच्या अधिकार्यांनी सांगितलं की या ऍपच्या मदतीने प्रवाशांना यापुढे विमानाने प्रवास करण्यासाठी जवळ कागदपत्रं बाळगण्याची गरज नाही. आता प्रत्येक चेक पॉइंटवर बायोमेट्रिक तंत्रज्ञानाद्वारे ओळख पटवली जाणार असून ही सगळी प्रक्रिया अतिशय सुरक्षित असणार आहे.
‘डिजिटल यात्रा’ वापरणं पूर्णपणे प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून असेल. वापरु इच्छिणारे प्रवासी ते डाउनलोड करू शकतात. नोंदणीसाठी प्रवाशांना आधार तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय त्यांना कोविड-19 लसीकरणाबाबत माहितीसह सेल्फी अपलोड करणं गरजेचं असणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai