विधिमंडळाच्या पायर्यांवर सत्ताधार-विरोधक भिडले
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 24, 2022
- 636
मुंबई : विधिमंडळाच्या पायर्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. सकाळी कामकाज सुरु होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळाले. राज्यात अनेक प्रश्न आ वासून उभे असताना तो सोडवण्यासाठी लढण्याऐवजी लोकप्रतिनिधींची आपआपसात अशी जुपंल्याने हे कृत्य शोभनीय नसल्याचे बोलले जात आहे.
सकाळी हाऊस सुरु होण्यापूर्वी कथित कोविड घोटाळ्याविरोधात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट विधिमंडळाच्या पायर्यावर आंदोलन सुरु केलं. यावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायर्यांवर आलेत.
काही वेळानं विरोधी पक्षातील आमदार आंदोलन करण्यासाठी पायर्यांकडे आले. बॅनर्स हातात घेऊन विरोधकांवर टीकास्त्र करत होते. ’बीएमसीचे खोके...मातोश्री ओके’ तसेच लवासाचे खोके...बारामती ओके सत्ताधार्यांची घोषणाबाजी केली. सत्ताधार्यांची घोषणाबाजीनंतर जोरदार राडा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. विधानभवनाच्या पायर्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांच्या अंगावर गेले, धक्काबुक्की केली यावेळी पायर्यांसमोर जवळपास 15 ते 20 मिनिटं प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह काही आमदारांनी मध्यस्थी केली. राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, अस यावेळी आ. भरत गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरपोक नाहीत, असं भरत गोगावले म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विरोधी गटातील आमदारांना वेगळीकडे जाण्याच्या सूचना केल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai