वैद्यकीय कॉलेजसाठी प्राध्यापक भरती
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2022
- 525
नवी मुंबई : महानगरपालिका स्वत:चे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी 44 जागांची प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी यांची प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 22 व 23 सप्टेंबरला नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत आवश्यक व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आहे. याबाबतची जाहीरात नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदव्युत्तर संस्थेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती वेगवान कार्यवाही करण्यात येत आहे. त्याच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले असून 5 शाखांचे पदव्युत्तर वैद्यकिय महाविद्यालय आगामी शैक्षणिक वर्षात सुरु होणार आहे. त्यासाठी केंद्राचे पाहणीपथकही नवी मुंबईत पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाहणी करणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai