टेम्पोची स्कुटीला धडक
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 10, 2022
- 676
स्कुटी चालकाचा मृत्यू ; दोन जखमी
उरण ः गव्हाण फाटा ते चिरनेर रस्त्यावरुन बॉयलर कोंबड्या घेऊन जाणार्या टेम्पोची स्कुटी चालकाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे (रा.हाशिवरे-अलिबाग) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर टेम्पो चालक व त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे.
गव्हाण फाटा ते चिरनेर रस्त्यावरुन खारपाडा दिशेने बॉयलर कोंबड्या घेऊन जाणार्या टेम्पोनी चिरनेरच्या दिशेने येणार्या स्कुटी चालकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सदर टेम्पो चालक सलिम हुसेन व त्यांचा साथीदार अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. वैभव म्हात्रे हे मुळ हाशिवरे अलिबाग येथील रहिवासी असुन ते वास्तव्यास उलवानोड येथे आहेत. ते इस्पात कंपनी वडखळ येथे कामाला असुन ते आपली नाईट ड्युटी संपवुन घरी येत असताना त्यांना चिरनेर टाकी गाव येथे विंधने गावाकडु पिक्अप टेम्पोने धडक दिली. सदर अपघात हा रविवारी (दि9) सकाळी ठिक 6-15 च्या सुमारास घडला आहे. या अपघाताची माहिती तिथे उपस्थित असलेले पुनाडे गावचे रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील उरण पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलिसांनी सदर अपघातग्रस्तांना या परिसरातील नागरिकांच्या मदतीने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अपघाता संदर्भात उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai