मुलायम सिंह यादव पंचत्वात विलीन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2022
- 724
मुंबई ः समाजवादी राजकारणातील सर्वांत मोठा आधारस्तंभ आणि युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ‘धरतीपुत्र’ मुलायम सिंह यादव पंचत्वात विलीन झाले. त्यांचा मुलगा आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सैफई येथील यादव कुटुंबापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या जत्रेच्या मैदानावर मुलायम सिंह यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. मुलायम सिंह यांच्या अंतिम दर्शनासाठी दीड लाखांहून अधिक लोक सैफईला पोहोचले.
अंत्यदर्शनासाठी देशभरातील व्हीआयपीही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सैफईवर पोहोचले. सकाळी सुरू झालेली ही प्रक्रिया दुपारपर्यंत सुरु होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अभिनेते अभिषेक बच्चन यांनी मुलायम सिंह यांना अंत्यसंस्काराच्या आधी श्रद्धांजली वाहिली. सैफईतील पावसात नेताजींच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव थेट अंत्यसंस्कारस्थळी पोहोचले आणि अखिलेश यादव यांचे सांत्वन केले.
मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ज्यांना स्टेजवर पोहोचता आले नाही त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यामुळे बॅरिकेड्सच्या खालून तसेच वरून स्टेजच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली. हे पाहून आयुक्त डॉ.राजशेखर यांच्या विनंतीवरून प्राध्यापक राम गोपाल यादव यांनी माईक घेऊन लोकांना हृदयस्पर्शी आवाहन केले, मात्र त्यांच्या नेत्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्दी थांबत नव्हती. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता पण गर्दी एवढी वाढली की लोकांना सांभाळणे कठीण झाले. स्टेजसमोर तयार केलेल्या डीमध्येही लोक घुसले. दुसरीकडे सैफईकडे जाणारे सर्व रस्ते पूर्णपणे ठप्प झाले होते. सकाळी 10 वाजेपर्यंत 1 किमी अंतरावरून गाड्या थांबविल्या जात होत्या, परंतु नंतर 3 किमी अंतरापर्यंत वाहने थांबवण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai