Breaking News
उरण ः उरण चारफाटा येथे 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास तरुणांमध्ये बोलता बोलता अचानक वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत ताहा गुलजार शेख (22) या तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. धारदार शस्त्र मानेवर लागल्याने सदर युवक गंभीर जखमी झाला. मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. सदर युवकाला त्वरित उरण मधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने जखमी युवकाला पुढील उपचारासाठी नवी मुंबईमध्ये पाठविण्यात आले. या हल्ला प्रकरणी रुपेश ललन प्रसाद (22)राहणार बेलपाडा, तालुका पनवेल याला उरण पोलिसांनी अटक केली असून दुसरा साथीदार मात्र पळून गेला आहे. या घटनेचा अधिक तपास उरण पोलीसांमार्फत सुरु आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai