Breaking News
नवी दिल्ली ः न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. डी. वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत. 10 नोव्हेंबर 2024 रोजी ते या पदावरून निवृत्त होतील.
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळं निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली होती. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांचा आज (9 ऑक्टोबर) राष्ट्रपतीभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.
सरन्यायाधीश लळीत यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. लळीत यांच्यानंतर देशाला पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश लाभले आहेत. चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूडदेखील सरन्यायाधीशपदी तब्बल 7 वर्ष 4 महिने अशा प्रदीर्घ काळासाठी कार्यरत होते. धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
दरम्यान, न्या. धनंजय चंद्रचूड यांना ही मोठी संधी मिळाली आहे. त्यांच्या आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार होत्या. वडील न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपद भूषवले. वडिलांचा वारसा चालवत न्या. धनंजय यांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. महत्त्वाच्या व सार्वजनिक हिताच्या न्यायनिवाड्यांद्वारे न्यायदान करण्याबरोबरच कायद्याच्या विद्यार्थ्यांना अध्यापन, महाराष्ट्रातील न्यायाधीशांना प्रशिक्षण, विधी व न्यायाशी संबंधित लेखन आणि विद्यापीठांमध्ये व्याख्याने असे विविधांगी काम त्यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai