330 दिव्यांग व्यक्तींना स्टॉल्सचे वितरण
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2022
- 503
नवी मुंबई - दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वयंरोजगाराव्दारे आर्थिक बळ देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जागा व स्टॉल उपलब्ध करून देण्याकरिता सोडत (लॉटरी) काढण्यात आली. 3 टप्प्यात अत्यंत पारदर्शक पध्दतीने झालेल्या या सोडतीमध्ये तब्बल 330 दिव्यांग व्यक्तींना सोडतीव्दारे स्टॉलचे वितरण करण्यात आले. सकाळी 11 वाजल्यापासून सायं. 5.30 वाजेपर्यंत साडेसहा तास नॉनस्टॉप चाललेली ही सोडत अत्यंत सुव्यवस्थित रितीने पार पडली.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देणे करीता प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहीर सूचनेस अनुसरून 714 दिव्यांगाचे अर्ज प्राप्त झाले होते.
अर्जांच्या छाननीनंतर वैध ठरलेल्या 31 अर्जांना 20 डिसेंबर 2019 रोजीच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. अंतिम यादी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. 10 नोव्हेंबरला सोडतीद्वारे स्टॉल्सचे वाटप करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai