मुद्रांकापोटी पालिकांना 284 कोटींचे अनुदान
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2022
- 500
नवी मुंबईला 12 कोटींचे तर पनवेलला 11 कोटी 91 लाखांचे अनुदान
नवी मुंबई ः शहरातील स्थावर मालमत्तांच्या व्यवहारांवर महसूल विभाग एकूण रक्कमेवर 1 टक्का या दराने अधिभार आकारते. या 1 टक्के मुद्रांक शुल्कापोटी राज्यातील 26 महापालिकांना 284 कोटी 25 लाख रक्कमेचा तिसरा हफ्ता नुकताच वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिकेला 12 कोटी 16 लाख 3134 तर पनवेल महापालिकेला 11 कोटी 91 लाख 11 हजार 281 रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चा कलम 60 अन्वये स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, देणगी, फलोपभोग गहाण यासंबंधीच्या व्यवहारांवर प्रतिभूत कलेल्या रक्केमवर एक टक्का आ दाराने अधिभार आकारण्यात येतो. सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यातिल 26 महापालिकांना देय असलेली 1 टक्के मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणार्या रक्कमेपैकी 147 कोटी रुपयांचा पहिला हफ्ता 29 एप्रिल 2022 रोजी, 483 कोटींचा दुसरा हफ्ता 19 जुलै 2022 रोजी तर 284 कोटी 25 लाख रक्कमेचा तिसरा हफ्ता 9 नोव्हेंबर 2022 रोजी वितरीत करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिकेला 12 कोटी 16 लाख 3134 तर पनवेल महापालिकेला 11 कोटी 91 लाख 11 हजार 281 असे एकूण 24 कोटी सता लाख 14 जार 415 रुपयांचे अनुदान दोन्ही महापालिकांना मिळणार आहे. जिल्हाधिकारी यांनी या रक्कमेत कोणतीही कपात न करता सदर अनुदान आहरण करुन संबंधित महापालिकांना 10 दिवसांत वितरीत करायचे आहे.
- तिसर्या हफ्त्याच्या वितरणास मान्यता
147 कोटी रुपयांचा पहिला हफ्ता 29 एप्रिल 2022 रोजी, 483 कोटींचा दुसरा हफ्ता 19 जुलै 2022 रोजी तर 284 कोटी 25 लाख रक्कमेचा तिसरा हफ्ता 9 नोव्हेंबर 2022 रोजी वितरीत करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai