गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 15, 2022
- 590
मुंबई ः मागील काही दिवसांपासून गोवर आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. सोमवारी एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर आता संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अधिक पावले उचलण्यात येणार आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव कुमार हे वॉर्ड अधिकार्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत गोवर आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी आणि लसीकरणावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईत गोवरने गंभीर आजारी असलेल्या एक वर्षीय बालकाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी या बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळाच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. शनिवारी प्रकृती आणखी गंभीर झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी या बालकाचे निधन झाले. गोवर आजाराच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम बचाव असल्याचे म्हटले जात आहे. त्यादृष्टीने लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यावर महापालिका जोर देणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिकेकडून ठिकठिकाणी सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. संशयित गोवर बाधित बाळांना जीवनसत्व ‘अ’ दिले जाते. तर, आवश्यकता वाटल्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले जाते आहे. मात्र, त्याच वेळेस बाळाचे लसीकरण न करण्यासाठी काही ठिकाणी पालकांकडून आग्रह धरला जात आहे. यासाठी विविध कारणे दिली जात आहेत.
मुंबईत गोवर रुग्णांची संख्या 126 वर पोहचली आहे. सोमवारी गोवरच्या संशियत रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचे समोर आल्यानंतर केंद्राकडून याची दखल घेण्यात आली आहे. मुंबईतील 12 विभागांमध्ये रुग्णसंख्येची वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या एम-पूर्व प्रभागात असून गोवंडीत अधिक बाधित आढळले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai