कंत्राटी कामगारांसाठी मनसेचा शंखनाद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 16, 2022
- 539
नवी मंबई ः महापालिकेअंतर्गत काम करणार्या 17 विभागांतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 14 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली. सात दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास शंखनाद मोर्चाचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
गेली कित्येक वर्षे मनसे मनपा कामगार कर्मचारी सेना कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा व आंदोलने करत असल्याचे आप्पासाहेब कोठुळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोविड काळात कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या ‘क’ व ‘ड’ वर्ग कंत्राटी कामगारांना मिळणार्या 50 लाखाचे विमा कवचचे पैसे अजूनही कामगारांच्या कुटुंबियांना मिळालेले नाहीत. याबाबत मनपा प्रशासनाने राज्य शासनास त्वरित प्रस्ताव पाठवावा. मनपा प्रशासनाने समान काम समान वेतन प्रस्ताव पाठवताना राजपत्रनुसार असणारी कुशल वर्गवारीती जी पदे अकुशल व अर्धकुशल वर्गवारी मध्ये नोंद केली आहे ती सर्व पदे कुशल वर्गवारी मध्ये टाकावीत आणि सुधारित प्रस्ताव लेखी स्वरुपात त्वरित पाठवावा. कामगारांच्या वार्षिक रजेबाबत नियम अटी शर्ती ठरवाव्यात, उद्योग ऊर्जा कामगारांच्या परिपत्रका नुसार 7070 रुपये महागाई भत्ता लागू करून फरकासकट अदा करावा. सर्व कंत्राटी कामगारांना ग्रॅज्यूएटी लागू करावी, ओळखपत्र देण्यात यावे. 2015 साली किमान वेतन लागू झाल्यामुळे त्याची अंबलबजावणी 2018 साली करण्यात आली. मात्र परिवहन विभागातील सफाई कामगारांना 27 महिन्याचा पगारातील फरक देण्यात आला नाही. त्याची अमलबजावणी त्वरित करण्यात यावी.
मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या या मागण्यांना आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मनपा विभागांशी चर्चा करून मनसेच्या मागण्यांवर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. महापलिका प्रशासनाने सात दिवसांच्या आत या मागण्या मान्य न केल्यास कामगारांसमवेत भव्य शंखनाद मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. या शिष्टमंडळात नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, चिटणीस अशोक पाटील, सहचिटणीस रणजीत सुतार, उपाध्यक्ष देवा भोईर, संदीप सुतार, महेंद्र पाटील, महेंद्र म्हात्रे, विष्णू शेळके, युनियन संघटक नीलकंठ कोळी, सुनील रायबोले व मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai