खारघरच्या चतु:सिमा हद्दीत दारुबंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2022
- 613
पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव
पनवेल ः खारघर नो लिकर झोन घोषित करावा या मागणीसाठी रविवारी खारघरच्या सर्व रहिवाशी आणि व्यापार्यांनी वसाहत एक दिवस बंद ठेवली होती. याची दखल घेत यापूढे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर किंवा नव्याने पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायत हद्दीत मद्यविक्रीसाठी बार व रेस्टॉरंटला न देण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामळे खारघरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
पनवेल पालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 ला झाली. पालिकेच्या स्थापनेपूर्वी खारघर वसाहत हा खारघर ग्रामपंचायतीचा भाग होता. पनवेल पालिकेच्या स्थापनेपूर्वी खारघर ग्रामपंचायत हद्दीत दारुबंदीचा ठराव सर्वानुमते ग्रामस्थांनी घेतला होता. तो दारुबंदीचा ठराव अद्याप पालिकेने बदललेला नाही, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्वसाधारण बैठकीत स्पष्ट करत ग्रामपंचायतीच्या तरतूदी संक्रमन अवस्थेत सर्व निर्णय जशास तसे लागू राहत असल्याचे स्पष्ट केले. याचसोबत ग्रामपंचायतीने घेतलेले लोकोपयोगी निर्णय पालिकेच्या स्थापनेमुळे ते रद्द होत नाहीत. उलट ते निर्णय कायम राहतात असेही ठरावाला मान्यता देताना आयुक्तांनी म्हटले. त्यामुळे यापूढे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर किंवा नव्याने पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायत हद्दीत मद्यविक्रीसाठी बार व रेस्ट्रोरेन्टला परवानगी देऊ नये, हा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. या ठरावाची प्रत संबंधित विभागांना पाठविणार असल्याचेही पालिका आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले.
खारघर वसाहतीच्या दोन्ही चतु:सीमेपर्यंत आयुक्त देशमुख यांनी घेतलेला खारघर दारुबंदीचा ठराव प्रभावशाली ठरणारा आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल पालिकेची कोणतीही परवानगी न घेता निरसूख बारला परवानगी दिली होती. त्यामुळे आयुक्त देशमुख यांनी सोमवारी घेतलेल्या ठरावानंतर निरसूख बारचा परवाना रद्द करण्याची वेळ येईल असेही चित्र आहे. परंतू त्याचसोबत पालिकेच्या स्थापनेपूर्वी अजीत पॅलेस व रॉयल ट्युलिप या हॉेटेलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या मद्यविक्रीच्या परवान्याबाबत काय निर्णय घेणार याकडे खारघरवासियांचे लक्ष लागले आहे.
- या भागात असणार दारुबंदी
आज झालेल्या ठरावानुसार महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ मधील पुर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायत क्षेत्रसिमीत खारघर ग्रामपंचायत पुर्व बाजू-खारघर से.17 संपूर्ण, से.16 पूर्व बाजू (खाडी लगत), सायन पनवेल हायवेवरील पूल, ओमकार एम्पायर इमारत से.10, मानसरोवर रेल्वे ब्रिज, तळोजा खाडी ते पनवेल पालिका हद्दीपर्यंत, खारघर ग्रामपंचायत पश्चिम बाजू-पनवेल महानगरपालिका खारघर गावाची पश्चिम दिशेकडील महसुल हद्द, खारघर टेकडी, खारघर हिल, फणसवाडी, खारघर व्ह्युव पॉईंट, चाफेवाडी, खारघर ग्रामपंचायत उत्तर बाजू-चाफेवाडी गाव, खारघर टेकडी ते खारघर व्ह्युव पॉईंट, गोल्फ कोर्स रोडने सी.जे.एम.शाळा सिअमय इमारत ते ग्राम विकास भवन, खारघर से.06, भुखंड क्र.8,13,14 से. 21, भुखंड क्र.85 से.21, निलमकुंज भुखंड क्र.151 (प्रस्तावित महापौर बंगला), खारघर से. 20, , प्लॉट नं.80 ते प्लॉट नं. 85,77,77ए,57,56,52, 51, भुखंड क्र.86 ते 95 से.19, भुखंड क्र. 11ब, 11अ, भुखंड क्र. 234 ते 243, खारघर ग्रामपंचायत दक्षिण बाजू-मानसरोवर, खारघर रेल्वे ब्रिज, तळोजा खाडीने पनवेल महानगरपालिका हद्दीपर्यंत खारघर गावाची दक्षिणेकडील महसुल हद्द या क्षेत्रासाठी सर्व प्रकारच्या किरकोळ व घाऊक मद्यविक्री व साठा करण्यास परवानगी असणार नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai