चार पंपहाऊससाठी 44 कोटी
- by मोना माळी-सणस
- Dec 16, 2022
- 533
मलनिस्सारण प्रकल्पाला शासनाची मंजूरी
नवी मुंबई ः राज्य सरकारने पालिका क्षेत्रातील नेरुळ, सानपाडा, वाशी, बेलापुर नोडमधील मलनिस्सारण प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या भागात मलनिस्सारण पंपिंग स्टेशन कामांकरिता 44 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सबस्टेशन रुम, पंप हाऊस, संरक्षित भिंत उभारणे, ऑपरेटर रुम व इतर संबंधित कामांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच या कामांची निविदा निघणार आहे.
अमृत योजनेमध्ये राज्यातील विविध 44 शहरांचा समावेश आहे. या शहरांना मलनिस्सारणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अभियानांअंतर्गत राज्य शासनाच्या 18236 कोटी रुपयांच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. यात नवी मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाचा समावेश असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांनी दिलेल्य ातांत्रिक मान्यतनुसार त्यास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने 22 नोव्हेंबर 2022 रोजी मंजूरी दिली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील नेरुळ नोडमधील शिरवणे सेक्टर 1अ येथील मलनिस्सारण पंपीग स्टेशनसाठी 10.90 कोटींची रक्कम मंजूर झाली आहे. तसेच सानपाडा सेक्टर 9, सेक्टर 30 वाशी येथील प्रकल्पासाठी 11.10 कोटींचा निधी तर बेलापुर सेक्टर 6 येथील पंपहाऊससाठी 22.42 कोटींचा मंजूर झाला आहे. यातील 25 टक्के हिस्सा केंद्र सरकारचा असून 45 टक्के रक्कम राज्य सरकार(पान 7 वर)
तर उर्वरित 30 टक्ेक हिस्सा पालिकेचा असणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश प्रशासकीय मंजूरीच्या आदेशापासून 45 दिवसांच्या आत द्यायचे आहेत. तसेच प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागाराची नेमणुक करण्याचेही आदेश शासनाने दिले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस