पालिकेचा 31 वा वर्धापन दिन जल्लोषात
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 04, 2023
- 534
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य म्हणून काम करताना तेव्हाच्या मोजक्या आर्थिक बजेटमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा वसा 31 वर्ष कायम राखत आज नवी मुंबईला देशातील अग्रमानांकित शहर म्हणून नावाजले जात आहे याचा आनंद व्यक्त करीत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या प्रगतीत सर्व घटकांचे अनमोल योगदान असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित वर्धापनदिन सोहळयाप्रसंगी त्या आपल्या मनोगत व्यक्त करीत होत्या.
कोविड काळाने आपल्याला खूप काही शिकविले. आपल्या जवळची माणसे गेल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारालाही आपण उपस्थित राहू शकलो नाही याचेही दु:ख आपण पचवले. या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांप्रमाणेच शेजारील शहरांमधील नागरिकांनाही उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा अधिक सक्षमीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी प्रास्ताविकपर मनोगतात मागील वर्षभरात नवी मुंबई महानगरपालिकेस मिळालेल्या राष्ट्रीय, राज्य स्तरावरील पुरस्कार, सन्मान यांचा विशेष उल्लेख केला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत अभियांत्रिकी, आरोग्य, शिक्षण, समाजविकास, क्रीडा, स्वच्छता, सुशोभिकरण, पर्यावरण, सांस्कृतिक उपक्रम, प्रवासी सेवा अशा विविध क्षेत्रात वर्षभरात झालेल्या कामांचे सविस्तर विवेचन केले. नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या सर्व सन्मानात अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीचा महत्त्वाचा वाटा असून त्यासोबतच स्वच्छतेमधील देशात तृतीय व राज्यातील प्रथम क्रमांकाच्या मानांकनात आपले स्वच्छता कर्मचारी व जागरुक नागरिक यांच्या सक्रिय सहभागाचाही सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. आज 31 वा वर्धापन दिन साजरा करीत असताना यापुढील काळात आपल्या शहराची मानांकने अधिक उंचावत राहण्याचा निर्धार त्यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने व्यक्त केला. याप्रसंगी डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेले वैदयकीय अधिकारी डॉ.रावसाहेब पोटे व डॉ.हरविंदर सिंग, समाजसेवक श्रीम.प्रतिभा देहाडे, अधिक्षक देवेंद्र ब्राम्हणे, वरिष्ठ लिपिक राजू रोहनकर, आरोग्य सहाय्यक सविता म्हामुणकर, जोडारी भरत देशमुख तसेच मुख्याध्यापिका श्रीम.ज्योत्स्ना पाटील, प्राथमिक शिक्षिका संजीवनी गावंड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण दिवसभर महानगरपालिका अधिकारी-कर्मचारीवृंदाचे गीत, नृत्य, नाटय आदी कलागुणदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयकॉनिक महापालिका मुख्यालय इमारतीस करण्यात आलेली आकर्षक विदयुत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मुख्यालय परिसराला भेट देत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai