जी 20 शिखर परिषदेच्या स्वागतासाठी 56 फूटाची रांगोळी
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2023
- 318
नवी मुंबई ः जी 20 राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या यजमान पदाचा मान 2023 साठी भारताला मिळाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राष्ट्रगटाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले आहेत. या शिखर परिषदेच्या स्वागतासाठी नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील रा.फ. नाईक विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर 56 फूट आकाराची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
भव्य रांगोळीमध्ये जी 20 राष्ट्रगटाचा 2023 वर्षासाठीचा नवीन लोगो चित्रित करण्यात आला आहे. ही भव्य रांगोळी प्रदर्शित करतेवेळी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री संजय उपाध्याय, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी 20 राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदी झालेली निवड भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून संदीप नाईक यांनी पंतप्रधान मोदी यांची विकासात्मक धोरणे आणि या धोरणांची यशस्वी अंमलबजावणी यांची दखल जागतिक पातळीवर वेळोवेळी सन्मानपूर्वक घेण्यात आलेली आहे, असे सांगितले.
जागतिक आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी 1999 मध्ये जी 20 राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली. भारतासह अमेरिका, रशिया या महासत्ता त्यांच्याबरोबरच ब्रिटन, फ्रान्स, चीन, जपान, इटली, सौदी अरेबिया, जर्मनी, तुर्की, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, दक्षिण कोरिया हे विकसित आणि विकसनशील देश या राष्ट्रगटाचे सदस्य आहेत. जी 20 राष्ट्रगटाची शिखर परिषद 9 सप्टेंबर 2023 रोजी दिल्ली येथे होणार आहे, त्यापूर्वी भारतातल्या विविध 50 शहरांमध्ये राष्ट्रगटाच्या 200 पेक्षा अधिक बैठका पार पडणार आहेत. नवी मुंबईमध्ये युवक, युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था सर्व घटक जी 20 परिषदेच्या स्वागत कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai