बांधकाम व्यावसायिकाला 38 लाखांचा गंडा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 24, 2023
- 598
नवी मुंबई : वाशीतील बांधकाम व्यावसायिकाला बनावट कागदपत्रांच्या आधारे नेरूळ एमआयडीसीतील 1300 चौ. मीटरच्या भूखंडाची विक्री केली होती. कोपरखैरणेतील संतोष पाटील याने व्यवहार करून त्यांच्याकडून तब्बल 38 लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय एमआयडीसीच्या सीईओच्या नावाने बनावट बँक खाते उघडून 33 लाखांचा पे ऑर्डर वटवून अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी सेक्टर 8 मध्ये राहणारे गीत चंदा (34) यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कोपरखैरणेत राहणाऱ्या संतोष पाटील नामक व्यक्तीने गीत चंदा यांची एका मध्यस्थाच्या मदतीने भेट घेतली होती. त्या वेळी त्याने नेरूळ एमआयडीसीतील 1300 मीटरचा प्लॉट त्याला अलॉट झाल्याचे सांगून एमआयडीसीच्या सही-शिक्क्याचे पत्र त्यांना दाखवले होते. त्यामुळे चंदा यांनी संबंधित जमीन 6 कोटी 50 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ठरल्याप्रमाणे चंदा यांनी संतोष पाटीलला पाच लाख रुपये रोख तसेच एमआयडीसीच्या नावाने 33 लाख 10 हजार रुपयांची पे ऑर्डर दिली होती. दरम्यान, एमआयडीसीत या जमिनीबाबत माहिती काढली असता संतोष पाटील याने दिलेले एमआयडीसीचे अलॉटमेंट लेटर तसेच एमआयडीसीत पैसे भरल्याची पावती बनावट असल्याचे चंदा यांना सांगण्यात आले. त्यामुळे चंदा यांनी एमआयडीसीच्या नावाने 33 लाख 10 हजार रुपयांची दिलेली पे ऑर्डर कुठल्या बँकेत वटवण्यात आली, याबाबत माहिती काढली असता एमआयडीसी सीईओच्या नावाने कोपरखैरणेतील अपना सहकारी मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँकेत बनावट खाते उघडून 33 लाखांची रक्कम काढून घेतल्याचे आढळून आले होते. त्यामुळे अखेर गीत चंदा यांनी वाशी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai