Breaking News
नवी मुंबई : वाशी सेक्टर-7 मधील रो हाऊसमधून रोख रकमेसह दागिने असा तब्बल 19 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी सेक्टर 7 मधील रो-हाऊसमध्ये राहणाऱ्या सुनिताराणी दुर्गादास सिंघल (76) यांचा मोठा मुलगा विरेंदर कुमार हा खारघरमध्ये राहण्यास आहे. सुनिताराणी यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने (ता. 25) पती विरेंदर कुमार याच्यासह वाढदिवसासाठी खारघर येथील घरी गेल्या होत्या. यादरम्यान सुनिताराणी यांच्या घरात काम करणारा विष्णू हा कामगार एकटाच होता. मात्र,27 जानेवारीला तोसुद्धा सुनिताराणी राहत असलेल्या रो-हाऊसला घर बंद करून खारघर येथे वाढदिवसासाठी गेला होता. हीच संधी साधून चोरट्यांनी शनिवारी पहाटे सुनिताराणी यांच्या रो हाऊसच्या तळमजल्यावरील बेडरूमच्या पाठीमागील खिडकीची लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी सुनिताराणी यांच्या घरातील 15 लाखांच्या रोख रकमेसह घरातील कपाटातील सोन्याचे दागिने असा एकूण 19 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai