Breaking News
नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा बुधवारी सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली लागू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. मात्र, या नव्या कर प्रणालीत कर वजावटीचा पर्याय असणार आहे. तसेच सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कर लावण्यात येईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात जुनी करप्रणाली रद्द केली आहे. आगामी आर्थिक वर्षापासून म्हणजे एप्रिल 2023 पासून फक्त नव्या करप्रणालीचा पर्याय करदात्यांना उपलब्ध असणार आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने नव्या प्राप्तिकर प्रणालीची घोषणा केली होती मात्र त्याची अंमलबजावणी ऑप्शनल होती, म्हणजे कोणती प्राप्तिकर प्रणाली निवडायची याचं करदात्यांना स्वातंत्र्य होतं. आता जुनी कर प्रणाली पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. निर्मला सीतारामण यांनी आज नवी करप्रणाली बंधनकारक आणि एकमेव पर्याय असल्याचं जाहीर केलं. मात्र नवी करप्रणाली बंधनकारक करत असतानाच जुन्या करप्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या करवजावटी आणि गुंतवणूक सवलतीचे फायदे नव्या कर प्रणालीमध्ये मिळणार आहेत. हा नोकरदारांपेक्षा मध्यमवर्गीय करदात्यांसाठी खरोखरच दिलासा आहे. जुन्या कर प्रणालीनुसार करदात्यांना कोणत्याही सवलती म्हणजे 80 नुसार गुंतवणूक केल्यावर मिळणाऱ्या वजावटी, गृहकर्जाच्या व्याजातील दोन लाखांपर्यंतची तसंच दोन वर्षांपूर्वीच सुरु करण्यात आलेली इलेक्ट्रिक वाहनांच्या कर्जाच्या दोन लाखांपर्यंतच्या व्याजात मिळणारी दोन लाख रुपयांची किंवा एनपीएस या पेन्शन योजनेत मिळणारी रु. पन्नास हजारांची अतिरिक्त वजावट मिळणार आहे. 2020 मध्ये करदात्यांना जुनी आणि नवी करप्रणाली असे पर्याय देण्यात आले होते. जुन्या कर प्रणालीत सर्व वजावटी आणि सवलती होत्या मात्र करपात्र उत्पन्नाचे टप्पे जास्त होते, तर आज जारी करण्यात आलेल्या नव्या कर प्रणालीतील करपात्र उत्पन्नाचे टप्पे मोठे म्हणजे पहिल्या सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, त्यापुढील तीन लाखांपर्यंत पाच टक्के, सहा ते नऊ लाखांपर्यंत दहा टक्के आणि नऊ ते बारा लाखांपर्यंत पंधरा टक्के तर पंधरा लाख करपात्र उत्पन्नावर तीस टक्के कर आकारणी होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai