Breaking News
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी देखील घोषणा करण्यात आली आहे. 0-40 वयोगटातील व्यक्तींचं हेल्थ स्क्रिनिंग होणार आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन देणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. तर 157 वैदकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे.
आरोग्याच्या विकासासाठी विशेष भर देण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी आधुनिक प्रयोगशाळा बनवण्यात येणार आहे. भारतीय महिला ॲनिमिया सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. या समस्येवर 2027 पर्यंत ॲनिमियावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
संशोधनासाठी स्वयंसेवी संस्थांसोबत एकत्र काम करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. अनेक आजारांचे मूळ कारण हे पाणी आहे. त्यामुळे बजेटमध्ये स्वच्छ पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
सर्व शहरांमध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यात मॅनहोलचं रुपांतर मशीन होलमध्ये करणार आहे. हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार असल्याची घोषणा निर्मला सितारामण यांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai