बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 07, 2023
- 748
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी तातडीने दखल घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एच.के. पाटील हे मुंबईत बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असून त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचामधील वाद विकोपाला गेला आहे. आता हा वाद थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिल्लीला पाठवला आहे. अजून हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य आहे, अशा आशयाचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलं आहे. त्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस बाहेर आली. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे. पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेताना नाना पटोले आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे. मात्र, आता थोरातांचा राजीनामा काँग्रेसचे हायकंमाड स्वीकारणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai