Breaking News
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका आरोपीस अटक केली असून त्याने केलेल्या आठ गुन्ह्यांची उकल झाली. आरोपी अट्टल चोरटा असून त्याच्या नावावर यापूर्वी 38 गुन्हे आहेत. आरोपी चोरी करताना घालत असलेल्या जॅकेटमुळे तो पकडला गेला.
अंकुश उत्तम ढगे असे अटक आरोपीचे नाव असून नववी नंतर त्याने शाळा सोडत गुन्हेगारीकडे वळला. त्याच्या नावावर आता पर्यत 38 गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसापासून कोपरखैरणे पोलीस ठाणे क्षेत्रात वाढलेल्या घरफोडी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ विटकर यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले होते. घरफोडी गुन्हेचे अनुषगांने कोपरखैरणे, बोनकोडेगाव, घणसोली गाव, या परिसरात एकुण 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेज तपासुन तसेच गोपनीय सुत्रांना कार्यान्वीत करण्यात आले. या प्रयत्नांना यश आले व संशयित आरोपी हा बोनकोडे परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्याने कोपरखैरणे पोलीस ठाणे परिसरात त्याचा साथीदार बबलु बंगाली याचे सह घरफोडया केल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपीताकडुन 8 घरफोडीच्या गुन्हयामधील एकुण 174 ग्रॅम 380 मिलीग्रॅम वजनाचे सोने अंदाजे किंमत रुपये 9 लाख 57 हजार आहे. या सह घरफोडीचे हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
आरोपी कडे लाल आणि पांढऱ्या रंगाचे एक जँकेट आहे. जे लकी जँकेट म्हणून प्रसिद्ध असून हे जँकेट आरोपीला अनेक गुन्ह्यात लकी ठरले म्हणून गुन्हा करते वेळी हेच जँकेट परिधान करून घरफोडी करीत होता. सीसीटीव्हीची पाहणी केली असता दर वेळी हेच जँकेट घातलेला इसम आढळून आला. याच लकी जँकेट मुळे खबऱ्यांनी त्याला ओळखला व पोलिसांना माहिती देताच सापळा रचला आणि त्यात तो अडकला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai