Breaking News
आधार कार्डमध्ये बदल करायचा म्हटला कि आधार केंद्रावर जावे लागते, यासाठी काही शुल्क अदा करून सेवा दिली जाते. मात्र आधार कार्डच्या सेवेसाठी काही शुल्क ठरवून दिले आहे. याबाबत जाणून घेणार आहोत.
जस शाळेचा दाखला, मृत्यूचा दाखला, मतदान कार्ड, पॅन कार्ड महत्वाचं आहे. तसेच आपली म्हणून आधार कार्ड सोबत असणं आवश्यक असते. त्या माध्यमातून आपण अनेक कामे करू शकतो. कारण आयुष्यात लागणाऱ्या अनेक गोष्टीसाठी आधार कार्ड महत्वाची भूमिका बजावत असते. शिवाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभकिंवा योजनांसाठी देखील आधार कार्ड आवश्यक असते. आधार कार्ड बाबत काही बदल करायचे असल्यास युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आधार कार्डच्या सर्विसेजबाबत आपल्या ग्राहकांना सतत अलर्ट करत असते. अशावेळी आधार सेंटरवरून हि कामे केली जातात.
अनेकदा आधारकार्ड मध्ये अनवधानाने काही चुका होतात, किंवा वैवाहिक स्थिती बदलल्यानंतर आधार कार्डमध्ये बदल करावा लागतो. म्हणजेच आधार कार्ड अपडेट करावे लागते. किंवा बाजारात, शहरात कुठे अनोळखी ठिकाणी तुमचे आधार कार्ड हरवले, आणि ते जर पुन्हा मिळवायचे असल्यास घरबसल्या मिळू शकतात. मात्र काही सेवा अशा आहेत कि ज्या सेवा तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर्समध्ये मिळू शकतात, त्यासाठी तुम्हाला आधार सेंटर गाठावे लागते.
आधार कार्ड जारी करणारी संस्था णखऊअख आधार कार्ड देताना 50 रुपये शुल्क घेते. तसेच आधार कार्डच्या वेगवगेळ्या कामासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. जर तुम्ही तुमचे बायोमेट्रिक अपडेट करत असाल, तर 50 रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय, डेमोग्राफिकची कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी 50 रुपयांचे शुल्क घेतले जाते. जर एखादा व्यक्ती पुन्हा आधार कार्ड घेत असेल, तर त्याला चार्ज द्यावा लागतो.
दरम्यान पीव्हीसी आधार कार्ड साठी 50 रुपये चार्ज घेतला जातो. मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठीही 50 रुपये चार्ज द्यावा लागतो. तसंच घधउ करण्यासाठी णखऊअख कडून 30 रुपये घेतले जातात. वरील कोणत्याही कामासाठी तुमच्याकडे कोणी अधिक पैसे मागत असेल, तर 1947 वर कॉल करुन तक्रार करू शकता. किंवा हशश्रर्ऽीिळवरळ.र्सेीं.ळप या वेबसाइटवरही तुमची तक्रार दाखल करू शकता. आधार कार्डमध्ये काही अपडेट करण्यासाठी पैसे घेतले जात नाहीत. आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता ऑनलाइन बदलता येतो. यासाठी पैसे भरावे लागत नाहीत. तसेच आधारची ई-कॉपी घेत असाल, तरीही यासाठी कोणताही चार्ज भरावा लागत नाही. तसंच एनरोलमेंट नंबर आणि पहिल्यांदा बायोमेट्रिक माहिती अपडेट करताना कोणताही चार्ज द्यावा लागत नाही.
आधार सेंटरवर द्यायचे शुल्क
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai