घर स्वच्छ ठेवण्याचे उपाय
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2023
- 618
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात घराला स्वच्छ ठेवणे अवघड असते. वेळेच्या अभावामुळे घराला स्वच्छ ठेवू शकत नाही. फक्त रविवारचा दिवसच आपण घर स्वच्छ करण्यासाठी देतो अशा परिस्थितीत काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपण दररोज पण काम करता करता घर स्वच्छ करू शकता.
- काम करताना स्वच्छता करा-
आपण स्वयंपाकघरात काम करता तेव्हा कोणतेही काम अपूर्ण सोडू नका. भाज्या कापून बास्केट आणि चाकू जागेवर ठेवा मिक्सर आणि ग्राइंडर देखील एकत्र धुऊन पुसून घ्या. - संधी मिळतातच काही कार्ये हाताळा-
काही लोक घरातील कामे उद्यावर ढकलतात. असं करू नका. वेळच्या वेळी कामे हाताळा ते रविवार पर्यंत ढकलू नका. संधी मिळतातच काम करा जसे की कपडे बदल्यावर लगेच कपाटात ठेवा. असं केल्याने काम साचणार नाही आणि वेळीच कामे पूर्ण होऊन घर देखील स्वच्छ होईल. - घरातील कामाचा ताण येऊ नये यासाठी कामाची जबाबदारी दोघांनी घ्या. घरात मुलं असल्यास त्यांना देखील त्यांच्या वयानुसार घरगुती कामे देऊ शकता. या मुळे कोणा एकावर त्याचा ताण पडणार नाही.
- वेळेची काळजी घ्या-
स्मार्ट लोक कामाचा सामना करण्यासाठी नेहमी वेळेचा सदुपयोग करतात जर आपल्याला एखाद्या पार्टीला जायचे आहे आणि आपला जोडीदार तयार होत आहे तर आपण त्याची वाट बघताना देखील काही कामे करू शकता. असं करून आपण आपले कामे करू शकता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai