पनवेलमध्ये 15 मार्चला पहिली डाक अदालत
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 27, 2023
- 551
पनवेल : नवीन पनवेल पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्राच्या वतीने 15 मार्चला पनवेल मुख्य डाकघर, दुसरा मजला येथे पहिली डाक अदालत घेण्यात येणार आहे.
मालेगाव, नाशिक, नवी मुंबई, पालघर, रायगड, ठाणे विभागांच्या डाक सेवांशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र आदी तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी.) देशामधील पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. मात्र, तरीही सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. या तक्रारींचा न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai