हंडा घेवून महिलांचा आक्रोश मोर्चा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 03, 2023
- 586
उरण : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने बुधवारी करंजा मधील शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन उरण तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. यावेळी उरणचे तहसीलदार,एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,गटविकास अधिकारी,सिडको हेटवणे पाणी पुरवठा अधिकारी व चाणजे ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन देत सर्व अधिकारी मोर्चाला सामोरे आल्याने तहसिल कार्यालयावरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या मालकीचे,कोण म्हणतोय देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाही,बोल रे बोल हल्ला बोल,प्रशासनावर हल्ला बोल,ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो, आदी जोरदार घोषणा देत हा मोर्चा उरणच्या एस. टी. बस स्थानक ते चारफाटा,पालवी हॉस्पिटल,बालई मार्ग, खिडकोली नाका,गांधी चौक ते उरण तहसील कार्यलय असा मोर्चा काढण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून करंजा ग्रामस्थांना 28 दिवसातून एकदा तासभर पाणी येत असल्याने या विरोधात करंजातील सात पाड्यातील ग्रामस्थ कॉ. भूषण पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आणि पाण्यासाठी एकच मागणी,हवे पिण्याचे पाणी असा एल्गार करीत बुधवारी 1 मार्चला उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
हंडा घेत काढलेल्या करंजा येथील महिलांच्या मोर्चाला यश आले असून तातडीने ग्रामपंचायती कडून 10 पाण्याचे टँकर सुरू करणे,पाण्यासाठी येथील गावात दहा बोरिंग मारणे,एमआयडीसी च्या जलवाहिनीवरील अनधिकृत जोडण्यावर कारवाई,एमआयडीसी कडून 1100 तर सिडकोच्या हेटवणे योजनेतून 150 युनिट पाणी पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai