Breaking News
साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पनवेल : सोनसाखळी चोरट्यांनी नवी मुंबईत धुमाकुळ घातला असून दिवसाला एक तरी सोनसाखळी चोरी होत आहे. मागील तीन महिन्यात सोनसाखळी चोरीच्या 34 वेगवेगळ्या घटना नवी मुंबईत घडल्या आहेत. खारघर पोलीसांनी चार चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून 12 सोनसाखळी चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे. चोरट्यांकडून तब्बल साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. केल्याची माहिती बुधवारी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पनवेल येथे दिली.
खारघर पोलीसांनी सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी विशेष पथक नेमले होते. या पथकाने फेब्रुवारी महिन्यात चोरट्यांनी सेक्टर 4 येथील रस्त्यावर मैत्रिणीसोबत बोलणाऱ्या कुमूदिनी अहिरे यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाची सोनसाखळी चोरली होती. पोलीसांचे पथक सीसीटिव्ही कॅमेराच्या माध्यमातून वसाहतीमध्ये चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना संशयीत व्यक्ती आढळल्या. या संशयीतांकडील दुचाकीचा माग घेण्यासाठी पोलीसांनी विशेष परिश्रम घेतले. अखेर चोरटे पोलीसांच्या हाती लागले. खारघर वसाहतीमध्ये हे चोरटे राहत असल्याचे पोलीसांच्या तपासात सिद्ध झाले.
यापुर्वी खारघर वसाहतीमध्ये सोनसाखळी चोरी प्रकरणातील सराईत फयाज शेख या संशयीताशी या दोन चोरट्यांचा संबंध असल्याचे सिद्ध झाले. तीन आरोपींना पोलीसांनी खाक्या दाखविल्यावर त्यांनी पाच खारघर, एन.आर.आय. पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि वाशी तसेच नेरुळ प्रत्येकी एक असे नऊ सोनसाखळी चोरी केल्याचे कबूल केले. सध्या हे चोरटे पोलीसांच्या ताब्यात असून पोलीसांनी चोरट्यांकडून मुद्देमालक जप्त केला आहे. चोरट्यांकडील 30 हजार रुपयांची दुचाकी सुद्धा पोलीसांनी जप्त केली आहे. लकरच हे सोने पिडीत महिलांना परत देण्याची कार्यवाही केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai