मुख्यमंत्री शिंदे यांना डी.वाय.पाटील विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2023
- 618
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, डी वाय पाटील विद्यापीठाकडून डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
मंगळवारी नेरुळ येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमत ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्र कुलपती शिवानी पाटील, कुलगुरू वंदना मिश्रा चतुर्वेदी, आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, वैद्यकीय सेवा व आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच सामाजिक कार्यासाठी विजय दर्डा यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते मानद डॉक्टरेट (डी.लिट) देण्यात आली. या कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर,ठाणे पालिका आयुक्त बांगर यासंह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
राज्यपाल बैस यांनी सांगीतले की प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का, याचा विचार करायला हवा, तसेच आदर्श राष्ट्रनिर्माण कार्यात उच्चशिक्षित तरुण डॉक्टरांचे योगदान मोलाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी केली. शिंदे यांनी, कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही एक खंत ही मनात होती. परंतु एक जिद्द होती मनामध्ये त्याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी बीए डिग्री घेतली. चांगले गुण मिळवून उत्तीर्णही झालो. आणखी पुढे आणखी काय काय करायचं. मात्र आता डॉक्टर एकनाथ शिंदे झालो. पण मी याच्याआधीच डॉक्टर झालो. मी छोटी-मोठी ऑपरेशन करत असतो असे ते मिश्किलपणे म्हणाले. तसेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेला डिलिट सन्मान मी राज्यातील जनतेला, गरीब, हुशार आणि संघर्ष करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो. समाजाने, या राज्याने मला प्रेम दिले म्हणून मी आज हा सन्मान स्वीकारत आहे. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, समर्पण भाव व कष्ट करण्याची तयारी हवी. हे असेल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai