
महिलेची हत्या करणारे दोन आरोपी जेरबंद
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 05, 2023
- 307
नवी मुंबई : पनवेलच्या शेलघर गावातील महिलेची हत्या करून फरारी झालेल्या मारेकऱ्यांना न्हावाशेवा पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे. डेव्हिड किडो (वय 35) आणि संजय कत्रू कच्छप (वय 40) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी शनिवारी रात्री सिमेंट ब्लॉकने हल्ला करून महिलेची हत्या केली होती. अनिता उर्फ आमेरदकानी सरावनन नाडर (वय 36) असे मृत महिलेचे नाव असून घटनेत तिची मैत्रीण मिना (नाव बदलले आहे) (वय 38) जखमी झाली.
घटनेतील आरोपी डेव्हिड किडो हा 2019 पासून मिना सोबत तिच्या घरात राहात होता. वर्षभरापूर्वी अनिताने डेव्हिड हा मिनाच्या मुलीवर वाईट नजर ठेवत असल्याबाबत मिनाला सांगितले होते. त्यावेळी अनिता व डेव्हिड यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यातून रागाच्या भरात डेव्हिडने दरवाजाजवळ ठेवलेल्या सिमेंट ब्लॉकने अनिताला मारहाण केली. यावेळी अनिताच्या मदतीला मिना गेली असता तिच्यावरही हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या अनिताचा काही वेळातच मृत्यू झाला आणि त्यानंतर डेव्हिड व त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. घटनेबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दीपक इंगोले, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर निकम, गणपत परचाके, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधाकर भोसले यांच्या पथकाने डेव्हिड किडो आणि त्याच्या सहकाऱ्यास अटक केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai