Breaking News
कोट्यवधीचे शंख जप्त
उरण : वन्यजीव संरक्षण कायद्यातील चौथ्या श्रेणीतील असलेल्या शंखाची (शेल) तस्करी उघड झाली आहे. यामध्ये वनविभागाने कोट्यवधी रुपयांचे शंख तस्कराकडून जप्त केले आहेत.
पेण ते पनवेल दरम्यान नाट्यमय, फिल्मी पद्धतीने केलेल्या कारवाईत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कॅपिझ शंख (शेल्स) जप्त केले असून त्यांची किंमत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये असू शकते. रायगडचे विभागीय वन अधिकारी आशिष ठाकरे, यांनी दिलेल्या माहीती नुसार ही शंख वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची मधील चौथ्या श्रेणीतील संरक्षित आहेत. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, सहाय्यक वनसंरक्षक संजय वाघमोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे (उरण), कुलदीप पाटकर (पेण) आणि ज्ञानेश्वर सोनवणे (पनवेल) यांच्या नेतृत्वाखाली वन अधिकाऱ्यांनी दोन हलक्या व्यावसायिक वाहनांचा पाठलाग करून सोमवारी ही कारवाई केली. या दोन्ही वाहनांमध्ये शंखांनी (शेल्सने) भरलेल्या गोण्या होत्या. ठाकरे म्हणाले की, आम्ही सोमवारी सकाळीच शंख जप्त केले आहेत आणि आता त्यांचा उगम आणि उपयोगाची कसून चौकशी केली जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai