यांना कोण आवरणार?
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2023
- 320
विजय आहिरे
ठेकेदारांकडून मात्र थेट जलकुंभ परिसरातून पाणी उपसा
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. परंतु काही ठेकेदारांकडून थेट जलकुंभ परिसरातून पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांना महापालिकेचे अभय मिळते आहे का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राज्यात सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. भविष्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाल्याने मुंबईसह काही उपनगरांमध्ये पाणीकपातीला सुरुवात झाली आहे. मोरबे धरणात सप्टेंबर पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असला तरी पाऊस लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये याकरिता आत्तापासूनच नवी मुंबई महापालिकेमार्फत पाणी बचतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. नुकतास जलसंवर्धन सप्ताह साजरा करुन पाणीबचतीचे महत्व पटवून देण्यात आले. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. एकीकडे पाणी बचतीसाठी आवाहन केले जात असताना दुसरीकडे मात्र काही ठेकेदारांकडून वाशीमध्ये पाणी उपसण्याचे प्रकार सुरू आहेत. जलकुंभ परिसरातून पाईपद्वारे टेम्पोच्या आत ठेवलेल्या बांधकाम वापरासाठी असलेल्या पाण्याच्या टाक्या भरल्या जात आहेत. मात्र या ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावले आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांवर पाणी वापराबद्दल बंधने आणत असताना,यांच्यावर कारवाई सुरु असताना दुसरीकडे मात्र ठेकेदारांना अभय दिले जात असल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
- रोपवाटिकांना चोरीचे पाणी
पालिकेने शहराच्या सौंर्द्यीकरणात भर घालण्यासाठी कारंजे व शोभेचे धबधबे उभारले आहेत. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बहुतांशी रोपवाटिका या शोभेच्या वास्तुंमधील पाणी चोरुन फुलवल्या जात असल्याचेही समोर आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai