नैनाच्या विकासासाठी 22 अधिकाऱ्यांचा बुस्टर
- by मोना माळी-सणस
- Apr 14, 2023
- 528
महसूल विभागाशी संबंधित नियमीत पदांची निर्मिती
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात नैना क्षेत्राच्या 464 किमी क्षेत्राचे नियोजन व सुनियोजीत विकासाची जबाबदारी सिडकोकडे आहे. मात्र अद्याप विकासाला चालना न मिळाल्याने अनेक प्रकल्प रखडले आहेत. नगरविकास विभागाने नैनाला गती देण्यासाठी 22 महसूल अधिकारी, कर्मचारी यांची नियमीत पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या 22 अधिकाऱ्यांच्या बुस्टरमुळे नैना प्रकल्पाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शासनाने रायगड जिल्ह्यातील 256 व ठाणे जिल्ह्यातील 14 अशा 270 गावांचे सुमारे 464 किमी क्षेत्र हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात ‘नैना' क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे. मात्र, सिडको शेतकऱ्यांकडून जी जमीन घेणार आहे, त्यापैकी 60 टक्के जमीन स्वत:कडे ठेवून उर्वरित 40 टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यासाठी आंदोलनाचे हत्यारही उपसले आहे. नैनामध्ये सध्या जे अधिकारी, कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे क्षेत्राबाहेरीलच कामे दिलेली आहेत. यामुळे ते खास नैनासाठी वेळ देऊ शकत नाही. यामुळे सिडकोचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठप्प पडला आहे. यातील अडचणी लक्षात घेऊन खास नैनासाठी आणखी उच्चाधिकारी द्यावेत, अशी मागणी सिडकोने केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने नैनाला गती देण्यासाठी 22 महसूल अधिकारी, कर्मचारी यांची नियमीत पदे निर्माण केली आहेत. या 22 अधिकाऱ्यांमध्ये एक उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक मंडळ अधिकारी, दोन तलाठी, एक जिल्हा भूमी अधिक्षक, दोन उपभूमी अधीक्षक, दोन शिरस्तेदार, चार निमतादार आणि आठ सर्व्हेअर यांचा समावेश आहे. नैनातील जमीन शेतकऱ्यांना सिडकोस दिल्यानंतर मूळ जमीन मालकांच्या हक्कात बदल होणार आहे. तसेच भूखंडाचे स्थान आणि नकाशामध्येही बदल होणार आहे. जमीनमालकांचे हक्क बदल करून नोंदी ठेवणे, प्रॉपर्टी कार्ड तयार करणे, जमिनीची मोजणी करणे, नवे नकाशे तयार करणे अशी कामे नवे 22 अधिकारी, कर्मचारी करणार आहेत.
- या पदांचा समावेश
या 22 अधिकाऱ्यांमध्ये एक उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक मंडळ अधिकारी, दोन तलाठी, एक जिल्हा भूमी अधिक्षक, दोन उपभूमी अधीक्षक, दोन शिरस्तेदार, चार निमतादार आणि आठ सर्व्हेअर यांचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस