वाशीत नवी मुबंईतील पहिले डायबेटिक फुट क्लिनिक
- by Aajchi Navi Mumbai
- May 05, 2023
- 278
नवी मुंबई ः वाशी येथील फोर्टीस-हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिले डायबेटिक फुट क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. या डायबेटिक फुट क्लिनिकचे उद्घाटन नवी मुंबईचे सह-पोलीस आयुवत संजय मोहिते आणि 1984 पासून या क्षेत्रात कार्यरत असणारे सुप्रसिध्द डायबेटिक फुट सर्जन डॉ. अरुण बाळ यांच्या हस्ते 5 मे रोजी करण्यात आले.
डायबेटिक फुट क्लिनिकमुळे आता मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या गरजांवरील सर्वांगिण उपचार एकाच छताखाली मिळू शकणार आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना डायबेटिक फुट सह अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. बरेचदा या रुग्णांच्या पावलांना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नसल्याचे जाणवते. या गोष्टीचा त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो. चालणे कठीण होते आणि गंभीर प्रकरणांमध्ये पाय शस्त्रक्रियेने कापून टाकावा लागतो. या समस्येकडे वेळच्यावेळी लक्ष पुरविणे आणि रुग्णांना अत्यावश्यक अशा शस्त्रक्रियात्मक, वैद्यकीय उपाययोजना पुरविणे ;डायबेटिक फुट क्लिनिक39;चा हेतू आहे. या क्लिनिक द्वारे स्क्रिनिंग, पॅथोलॉजी, जखमांची देखभाल, शस्त्रक्रियात्मक उपचार आणि इतर उपचार प्रक्रियांसह अनेक सोयीसुविधा पुरविल्या जातील.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पावलांशी संबंधित समस्या सर्रास दिसून येतात. ज्यांच्याकडे लक्ष देणे आणि डॉक्टरांच्या टीमच्या परस्पर समन्वयातून त्यावर उपचार केले जाणे आवश्यक आहे. या समस्यांचा रुग्णाच्या आयुष्यावर विपरित परिणाम होण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार सुरु करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबतीत रुग्णांना आवश्यक असलेल्या देखभालीच्या उपलब्धतेत असलेल्या त्रुटी भरुन काढण्याच्या दृष्टीने आणि वेळच्या वेळी मिळालेले उपचार आणि प्रतिबंधात्मक कृतींमुळे होणाऱ्या दीर्घकालीन फायद्यांबद्दल मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने डायबेटिक फुट क्लिनिक फायदेशीर ठरेल, असे सह-पोलीस आयुवत संजय मोहिते यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भारतामध्ये मधुमेहाचे 7.8 कोटी रुग्ण आहेत, ज्यापैकी 15 टक्के लोकांमध्ये पायांच्या समस्या आढळून येतात. या 15 टक्के लोकांपैकी 1 टक्का लोकांना आपला पाय गमवावा लागतो. मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाने वर्षातून एकदा आपल्या पायाची तपासणी करुन घ्यावी. आपल्या नसा, रक्तवाहिन्या आणि सांध्याचे काम कसे चालले आहे ते तपासून घेतले तर सदरची समस्या टाळता येण्याजोगी आहे. मात्र, बहुतांश रुग्ण आपल्या हातापायांकडे दुर्लक्ष करतात. त्याऐवजी ते डोळे, किडनी, हृदय आदिंच्या नियमित तपासण्या करुन घेण्यास प्राधान्य देतात, असे डायबेटिक फुट सर्जन डॉ. अरुण बाळ यांनी सांगितले. पावलांचा अल्सर असलेल्या रुग्णांची संख्या प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि त्वचरोगांचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीस (रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा येणे) असलेल्या मधुमेहींमधील मृत्युचे प्रमाण खूप अधिक असून याची संख्या स्वादुपिंड आणि फुपफुसाच्या कॅन्सर खालोखाल सर्वाधिक आहे. असे असतानाही पावलांची तपासणी नियमितपणे केली जात नसल्यामुळे या आजारामुळे होणाऱ्या मृत्युची संख्या दुर्लक्षित राहत आहे, अशी खंत डॉ. बाळ यांनी व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai