Breaking News
नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण तीन आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडून एकूण 4 रिक्षा व 4 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्यांच्या अटकेने 9 गुन्हे उकल झाली आहे. गेल्या काही दिवसात एपीएमसी परिसरातून दुचाकी, रिक्षा, कार अशा वाहनांच्या चोरीत वाढ होत होती.
याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक तनवीर शेख, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, निलेश शेवाळे, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, सुनिल पाटील, अमर बेलदार, प्रभाकर म्हात्रे, संदेश म्हात्रे, पोलीस नाईक प्रदिप हरड, शशिकांत नलावडे, सोमनाथ काळे, पोलीस शिपाई आशिष पाटोळे, अमर भिलारे, संतोष वाटकर, यांचे पथक नेमले.
या पथकाने अभिलेखावरील आरोपी, सीसीटीव्ही फुटेज तपासणी घटनास्थळ पाहणी, तसेच तांत्रिक तपास करीत असताना उलवे येथे राहणाऱ्या अशरफ फजनुदीन गोरी या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याचेकडे कौशल्यपूर्व तपास केला असता त्याने एकुण दोन ऑटो रिक्षा व चार मोटारसायकल चोरी केल्याचे तपासामध्ये निप्पन झाले. या शिवाय अन्य एका वाहन चोरी प्रकरणाचा तपास करीत असताना शाबान अली अनवरअली शहा व मुकेशकुमार बनारसी गुप्ता दोन्ही राहणार मानखुर्द यांची नावे समोर आली. दोन्ही अभिलेखावरील आरोपी आहेत. त्या दोघांनाही ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवत चौकशी केली असता त्यांनी एकूण दोन ऑटो रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai