दिवाळे गावात विकास कामांचे लोकार्पण
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2023
- 468
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
नवी मुंबई ः नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गावाचा विकास होत आहे. विविध प्रकारच्या 24 विकास कामांचा यात समावेश असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. गावातील स्थानिक डोलकर मच्छीमार संस्थाकरिता जाली विणण्याकरिता निवारा शेड व स्टोर रूम तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता 2 गजेबो यांचा लोकार्पण सोहळा तसेच ग्रंथालय व संगणक प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय इमारत, व्यायाम शाळा या बांधकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव दत्तक घेतले आहे. त्याअनुषंगाने गावात विकास कामे सुरु आहेत. नुकतेच गावातील स्थानिक डोलकर मच्छीमार संस्थाकरिता जाली विणण्याकरिता निवारा शेड व स्टोर रूम तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता 2 गजेबो यांचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई पालिका शहर अभियंता संजय देसाई व न.मुं.म.पा माजी विरोधी पक्ष नेता पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच ग्रंथालय व संगणक प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय इमारत, तरुणांनसाठी व्यायाम शाळा या बांधकामांचा भूमिपूजन सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी व स्थानिक कोळी बांधव तसेच पालिका अधिकारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी आमदार मंदाताई यांनी सांगितले की, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत भव्य, सुसज्ज सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, रिंगरोड, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, विरंगुळा केंद्र , गजेबो गार्डन, बहउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ, भाजी व फळ मार्केट तसेच सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याकरिता रु.15 कोटी रुपये अपेक्षित खर्च करण्यात येणार आहे. याकरिता आमदार निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. दिवाळे गाव हे स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळणार आहे. स्वच्छता व सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे. दिवाळे गाव हा माझा पायलट प्रोजेक्ट असून त्याच धर्तीवर बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai