उत्तम करिअरचा हॉटेल मॅनेजमेंट पर्याय
- by Aajchi Navi Mumbai
- May 30, 2023
- 473
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर ची निवड करणे हा मोठा प्रश्न आहे. सध्या टुरिझम आणि हॉस्पिटीलिटी क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअर लोकांसाठी खूप फायदेशीर आणि रोमांचक बनले आहे आणि अधिकाधिक विद्यार्थी ते करिअर म्हणून निवडत आहेत. हॉटेल मॅनेजमेंट नोकऱ्यांमध्ये खाद्य आणि पेय सेवा, फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स, सेल्स आणि मार्केटिंग आणि अकाउंटिंग इत्यादीसारख्या अनेक कार्यांचा समावेश होतो. भारतातील अनेक सरकारी महाविद्यालये आणि खाजगी संस्था हॉटेल व्यवस्थापनात प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रम देतात.
पात्रता-
हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी किमान पात्रता 10+2 असणे आवश्यक आहे. कोर्सची किंमत आणि कालावधी यावर अवलंबून, एखादी व्यक्ती प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमाची निवड करू शकते. प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहा महिने ते एक वर्ष कालावधीसाठी आयोजित केले जातात, तर डिप्लोमा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचे आणि पदवी अभ्यासक्रम तीन वर्षे कालावधीचे असू शकतात. शासन मान्यता प्राप्त महाविद्यालये आणि संस्थांसाठी निवड दरवर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे केली जाते. परीक्षेत इंग्रजी, रीझनिंग, सामान्य विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयात बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. या अभ्यासक्रमासाठी अंतिमत: निवड होण्यापूर्वी उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व आणि योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाते. खासगी संस्थाही उमेदवारांच्या निवडीसाठी याच तत्त्वावर परीक्षा घेतात.
नोकरीची शक्यता-
हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वाढत्या स्पर्धेमुळे हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीच्या अनेक संधी आहेत. हॉटेलमध्ये ऑपरेशन्स, फ्रंट ऑफिस, फूड अँड बेव्हरेजेस, अकाउंटिंग, सेल्स अँड मार्केटिंग, इंजिनीअरिंग, सिक्युरिटी इत्यादी अनेक विभाग असतात. त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात आपले करिअर करू शकते.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील नोकऱ्यांव्यतिरिक्त, हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा/ग्रॅज्युएट्स विद्यार्थी या क्षेत्रातही चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतात:
- विमान सेवा आणि केबिन सेवा.
- क्लब व्यवस्थापन.
- क्रूझ शिप हॉटेल व्यवस्थापन.
- रुग्णालय ऍडमिनिस्ट्रेशन आणि कॅटरिंग.
- हॉटेल आणि टुरिझम असोसिएशन.
- भारतीय नौदलात हॉस्पिटीलिटी सर्व्हिस.
- चछउ कंपन्यांमधील हॉस्पिटीलिटी सर्व्हिस.
- फॉरेस्ट लॉज.
- गेस्ट हाऊस, रिसॉर्ट्स.
- किचन मॅनेजमेंट (हॉटेलमध्ये किंवा कॉलेज, शाळा, कारखाने, कंपनी गेस्ट हाऊस इ. मध्ये चालणाऱ्या कॅन्टीनमध्ये)
- रेल्वेचे खानपान विभाग, बँका, सशस्त्र दल, शिपिंग कंपन्या इ.
- हॉटेल आणि खानपान संस्था.
- एक उद्योजक म्हणून स्वयंरोजगार.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai