वटपौर्णिमा निमित्त फणसाला मोठी मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 02, 2023
- 372
नवी मुंबई ः वटपौर्णिमेनिमित्त नवी मुंबईत कोकणासह दक्षिण भारतातून फणस दाखल झाले आहेत. वटपौर्णिमेच्या वाणात आंब्यासह फणसाच्या गरांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे सध्या बाजारात फणसाला मोठी मागणी आहे. घाऊक बाजारात कच्च्या फणसाचे दर 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आहेत, तर पिकलेल्या फणसाचे दर 16 ते 36 रुपये किलो आहेत.वाशीतील घाऊक बाजारात कच्च्या फणसाची वर्षभर आवक होत असते. कर्नाटक, तामिळनाडूमधून एक ते दोन गाड्या बाजारात येतात. उन्हाळ्यापासून बाजारात पिकलेल्या फणसाच्या दोन ते तीन गाड्या बाजारात यायला सुरुवात होते. कोकणातील फणस म्हणून फणसाची ओळख असली, तरी सध्या मुंबईच्या बाजारात मात्र दक्षिण भारतातून फणसाची मोठी आवक होत असते. वटपौर्णिमेसाठी मात्र कोकणातूनही फणस बाजारात येतो. त्यामुळे फणसाची आवक वाढते. एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवारी 134 टन फणसांची आवक झाली आहे. सध्या घाऊक बाजारात कच्च्या फणसाचे दर 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आहेत, तर पिकलेल्या फणसाचे दर 16 ते 36 रुपये किलो आहेत. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात कच्च्यासोबत पिकलेल्या फणसाची आवक आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai