वसुंधरा अभियानात पनवेल पालिका राज्यात तिसरी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 06, 2023
- 448
पनवेल : राज्यातील अमृत शहरांमध्ये माझी वसुंधरा 3.0 अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरात पनवेल महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला असून राज्य सरकारतर्फे पनवेल पालिकेच्या प्रशासनाला 5 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
सोमवारी मुंबई येथील नरीमन पॉईंट परिसरातील जमशेद भाभा थिएटरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझी वसुंधरा 3.0 सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त व अधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी आयुक्त देशमुख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ, उपायुक्त कैलास गावडे, विठ्ठल डाके, गणेश शेटे, प्रकल्प कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2016 सालच्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील 27 वी महापालिका म्हणून पनवेल महापालिकेची स्थापना करण्यात आली. वय कमी असले तरी या शहरातील नागरिक, स्वच्छता दूत, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता यामुळे हा मान मिळाल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai