कांदा-बटाटा मार्केटची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 21, 2023
- 511
गाळे खाली करण्याची पालिकेची नोटीस
नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजार आवारातील एफ विंग मध्ये इमारतीचा सज्जा कोसळला. या दुर्घटनेची दखल घेऊन नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी थेट एपीएमसी सचिवांना नोटीस पाठवून कांदा-बटाटा मार्केट रिकामे करण्याचे निर्देश दिले.
एपीएमसीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. कांदा बटाटा बाजारात काही इमारती आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट आहे. कांदा बटाटा बाजारातील बरेच गाळे जीर्ण झाले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार आवारातील गाळा नंबर एफ 129-130मधील सज्जा आणि पत्र्याचे शेड कोसळण्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. मागील वर्षी कांदा बटाटा बाजारातील लिलावगृहाची कमान कोसळली होती. मात्र तरी देखील येथील धोकादायक इमारती खाली न करता त्यामध्येच व्यापार सुरू आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महापालिका अधिकारी 20 जुलै रोजी कांदा-बटाटा बाजार आवारातील धोकादायक गाळे रिकामे करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घेऊन पोहोचले. मात्र, कांदा-बटाटा बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी प्रखर विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात 200 पेक्षा अधिक घाऊक व्यापारी व्यवसाय करतात. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी रात्री आठच्या सुमारास इमारतीचा सज्जा कोसळला. बाजार बंद झाल्यानंतर सदर दुर्घटना घडल्याने कोणतीही हानी झाली नसली तरी कांदा-बटाटा मार्केट अती धोकादायक श्रेणी मध्ये येते. व्यापाऱ्यांच्या अंतर्गत वादात कांदा-बटाटा बाजार आवाराचा पुनर्विकास रखडल्याने व्यापारी जीव मुठीत धरुन व्यवसाय करत आहेत. मात्र, पुन्हा कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका अधिकारी पोलिसांचा फौजफाटा घेऊन गाळे रिकामे करण्यासाठी गेले असता व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. परंतु, महापालिका अधिकारी कारवाई करण्यावर ठाम होते. अखेर एपीएमसी सचिव राजेंद्र भुसारे यांच्याकडे व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना झाले. तोपर्यंत कारवाई थांबवण्यात आली. अचानक गाळे रिकामे केले तर मोठ्या प्रमाणात असलेला कांदा- बटाटे घेऊन जाणार कुठे? तसेच मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सर्व पुरवठा बंद होईल, अशीही भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai